प्रोजेक्ट म्हणजे प्रोजेक्ट असते ….

प्रोजेक्ट म्हणजे प्रोजेक्ट असते,
तुमचे आणि आमचे, अगदी सेम असते 🙂

पहिले ४ महिने सगळे अलबेल असते,
सगळ्या dashboard वर “green” दिसत!
शेवटच्या २ महिन्यात सगळे फाटत,
green dashboard red red होत जाते!

प्रोजेक्ट म्हणजे प्रोजेक्ट असते….

सगळ्यांना सगळे कालच हवे असते,
start लाच प्रोजेक्ट late झालेले असते!
waterfall असो, कि असो agile,
प्रोजेक्टमध्ये आता, मध्यरात्री कोंबडे आरवते!

प्रोजेक्ट म्हणजे प्रोजेक्ट असते….

scope, time, cost चे कोडे सुटत नसते,
कुठल्याही प्रोजेक्ट चे घोडे इथेच आडते!
मंगळयानासारखे एखादेच प्रोजेक्ट चुकते 🙂
चुकलेल्या प्रोजेक्टमधून कोणी कधी शिकते?

प्रोजेक्ट म्हणजे प्रोजेक्ट असते….

कुणीतरी estimate करते, कुणीतरी करते commit,
PM ची होतेय फरपट, stakeholders ची कीटकीट!
१ महिना plan करूनही planning सगळे चुकते!
PM ला मग PMP training ला पाठवायचे ठरते! 🙂

 

प्रोजेक्ट म्हणजे प्रोजेक्ट असते,
तुमचे आणि आमचे, अगदी सेम असते 🙂

 

 

 

— चिंगुडे

3 thoughts on “प्रोजेक्ट म्हणजे प्रोजेक्ट असते ….

  1. Shriniwas Deshpande says:

    ha ha ha. Ultimate.

  2. Gaurish Kerkar says:

    An innovative way (and melodious) way of presenting serious challenges faced in Project Management

  3. Hanumant says:

    Mastach..!! 🙂 very true and practical..Thanks for sharing

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *