MVP म्हणजे काय रे भाऊ?

Less is more? So MVP….

मध्यंतरी आमच्या घरी विशेष पाहुणे जेवायला येणार होते. म्हणून मग पुरण पोळीचा बेत करायचे ठरले. आता पाहुण्यांसाठी जो बेत केला जातो त्यात काही “must have” पदार्थ असतात. जसे कि – पुरण पोळी, तूप अथवा दुध, वरण, भात. काही “should have” पदार्थही असतात, जसे कि बटाट्याची भाजी, पापड (म्हणजे तेmust have नसते, पण नसले तर असायला पाहिजे असे वाटत राहते). आणि इतर अनेक पदार्थ हे नसले तरी चालणार असते, पण “पाहुण्यांना काय वाटेल?” ह्या भीती पोटी ते आपण करत बसतो. जसे कि – भजी, चटणी, कोशिंबीर, कटाची आमटी (एक निरर्थक पदार्थ – माझ्या वयक्तिक मते!).

खरे तर पुरण पोळी बेत असताना, पाहुणे फक्त पुरण पोळी आणि तूप खाऊन तृप्त होणार कि नाही हे ठरणार असते, पण गम्मत म्हणजे, आपण “ताट भरलेले दिसावे म्हणून” इतर खूप काही करतो. बर्याच वेळा हे सगळे उरतेच आणि मग दुसर्या दिवशी त्या कटाच्या आमटीचे थालीपीठ करण्याचाहि एक कट शिजतो ☺ त्याच थालीपीठात उरलेली चटणी सुधा दडपून टाकली जाते!

म्हणजे पाहुण्यांचे समाधान (outcome) हे मोजक्याच गोष्टींवर अवलंबून असते. पण आपल्याला असे वाटते कि जास्ती पदार्थ पानात दिसले (more output) म्हणजे पाहुणे समाधानी होणार? एवढी पदार्थांची गर्दी करून सुद्धा जर पुरणपोळीच गंडली तरoutcome चे काय होते? ☺ मग ह्या इतर सगळ्या nice to have गोष्टींमध्ये खर्च होणारा वेळ, पैसा, energy वाचवली तर चालणार नाही का? कारण नाहीतर हे सगळे दुसर्या दिवशी पुन्हा थालीपीठ स्वरुपात आपल्यालाच खावे लागते ना?

हे सगळे सुचायचे कारण म्हणजे काल एका product manager शी बोलताना तोही म्हणाला कि पुढच्या रिलीज मध्ये हे फिचर पुन्हा घेतील कि नाही माहित नाही त्यामुळे आत्ताच सगळे करून टाकू! आता ह्या फिचर मध्येपण असेच कोशिंबीर आणि कटाच्या आमटी सारख्या requirement होत्या! पण पाहुणा (customer) चे समाधान नक्की कशावर ठरेल हे सोडून पुन्हा हे फिचर येणार नाही ह्या भीती पोटीच आपण आपला वेळ, पैसा, energy नक्की योग्य ठिकाणी खर्च करतो का? त्याच प्रमाणे टेस्टिंग करताना QA खरंच valuable validation किती करतात? कि उगाच कोपऱ्या कोनाड्यातले scenarios हुडकून काढून, खरा user कधी करणार नाही असे प्रयोग करून defects ची संख्या वाढवण्यात धन्यता असते?

पुरण पोळी, साजूक तूप हेच केवळ (Minimum Viable Product)MVP आहे! समाधान मोजक्याच गोष्टींवर ठरते, किंबहुना ते तसे ठरावेहि! More output (even bugs or testing) doesn’t necessarily mean better outcome! In fact, many times, less is more, right? ☺