जसा जसा agile ला बाजारात भाव मिळत गेला तसा तसा एक “स्क्र्म मास्टर” नावाचा रोल चर्चेत आला. “हा माणूस नक्की करतो काय”? ह्याबद्दल बर्याच ठिकाणी गोंधळ होता आणि आजही असतो. ह्या रोले साठी बाजारात काही “फास्ट फूड” कॅटेगरीतली सर्टिफिकेटस पण आली आणि त्याने हा गोंधळ अजून वाढवला! जो तो उठसुठ “प्रमाणित स्क्र्म मास्टर” बनला. “servent leader”, “facilitator”, “empathy”, असली नवीन विशेषणे कानावर आदळून, “हे काही तरी वेगळे आहे?” असे जाणवून एक फुगा फुगवला गेला! पण साधारण आजही “management” कॅटेगरीला “servent का असेना पण ८-१० जणांमागे एक मुकादम [“व्हाईट कॉलर भाषेत” टीम लीड] तर लागतोच” हे पटायला फारसे अवघड गेले नाही आणि हा रोल तसा रुळला. पण जरी तो “रुळला” असला तरी तसा अजूनही “कळलेला” नाही बहुतेक?
ह्या रोलचे नक्की काम काय हे जाणून घ्यायला आपण “rowing” ह्या खेळाचे उदाहरण घेऊ. ह्या खेळात ४ किंवा ८ जणांची टीम एक बोट वल्हवत नेते. जी टीम कमीत कमी वेळात ठराविक अंतर पार करेल ती जिंकते. ह्या बोटीत ह्या ८ “rowers” खेरीज एक अन्य व्यक्तीहि बसलेली असते. हि व्यक्ती वल्ह न घेता बोटीत बसते! तिचे वजन ह्या ८ जणांनीच खेचायचे असते. ह्या रोल ला “Cox” असे म्हणतात. ह्याच्या जबाबदार्या साधारण खालील प्रमाणे असतात –
- सुरवाती पासून शेवट पर्यंत बोटीला एका सरळ रेषेत आणि वेगात नेणे. बोट जर डावी-उजवी कडे जात राहिली तर अर्थातच एकूण कापायचे अंतर वाढते!
- आठहि जणांनी समान ताकदीने बोट ओढणे आवश्यक असते.
- अर्थातच हे अशक्य असते. कारण प्रत्येक व्यक्तीची ताकद, आणि त्या वेळचा जोश, वेगळा असू शकतो.
- जर डाव्या बाजूने जोर जास्ती लागला तर बोट उजवीकडे जात राहील, किंवा उलटे. हे कमीत कमी होऊ देणे
- बोटीचा स्पीड हा ८ पैकी सर्वात स्लो rower ठरवतो! तेंवा त्या क्षणाला तो “slowest rower” टिपून त्याला motivate करणे आणि त्याच वेळी अती उत्साही rower ला आवर घालणे!
- कारण ८ पैकी अतिउत्साही rower ने जोरजोरात rowing करून टीम जिंकणार नसते! आणि हे त्या Cox ला कळावे लागते!
- सर्वांचे वल्हे पाण्यात एकाच वेळी जाऊन एकाच बेळी ते पाण्याबाहेरहि यावे लागते. हा ताळमेळ चुकला तर बोल हलू लागते आणि कलंडूहि शकते! अर्थातच ह्याने बोटचा वेग मंदावतो.
- असे जितके कमी होईल तितकी ती बोट जास्ती efficiently प्रवास करेल. तर ८ जणांचे synchronization सांभाळणे!
- त्यावेळचा पाण्याचा करंट, वाऱ्याची दिशा, जोर, इतर टीमची position, इत्यादी चा अंदाज घेऊन डाव्या किंवा उजव्या बाजूला जोर कमी-जास्त करत राहणे. इत्यादी….
आता पहिले तर हा Cox स्वतः बोट चालवत नाही. पण तो नसेल तर हि बोट एका सरळ रेषेत, आवश्यक त्या adjustments करत efficiently प्रवास करणार नाही! मग ह्या Cox ला overhead म्हणायचा कि आवश्यक investment?
आता खालील काही गोष्टींचाही विचार करूयात –
- हा Cox स्वतः बोट चालवू लागला तर तो दिशादर्शन आणि समतोल साधू शकेल का?
- हा व्यक्ती टीमला आवश्यक ती मदत न करता, टीम मधला “weakest link” ला आधार न देता, नुसताच ओरडत राहिला किंवा प्रवचन देत राहिला तर टीमला ह्याची काही “value” जाणवेल का?
- Cox हा टीम सोडून स्वतःचे “वजन वाढवू” पाहिल तर हि टीम “high performing” कधी होईल का?
- “ह्याचे वजन आम्ही फुकटच ओढतोय” असे टीमला वाटू नये, ह्यासाठी Cox स्वतःच जबाबदार नाही का?
- आणि management ने खर्च वाचतो म्हणून Cox ला बोटपण ओढायला लावणे हे अधिक खर्चिक होणार नाही का? 🙂
साधारण ८ जणांच्या agile टीम ला अशाच एका “Cox” ची साथ हवी असते. त्याचे काम म्हणजे टीमला शक्य ती मदत करून (servant leadership), सर्व अडथळे दूर करून (impediments remover), टीमची “weakest link” हेरून, त्यावर मेहेनत घेऊन त्या टीमला “high performing” टीम बनवणे. तिथे “dogmatic” प्रवचने देऊन स्वतःचे वजन वाढवण्यापेक्षा “pragmatic coaching” ने एकंदर सिस्टम मधले fat घटवणे जास्ती महत्वाचे असते! नाहीतर “स्क्र्म मास्टर” चा “ड्रम मास्टर” व्हायला वेळ लागत नाही! ज्या क्षणी टीमला माझे ओझे वाटले, त्या क्षणी मी स्क्र्म मास्टर म्हणून हरलो! आणि ह्यात टीमचा काय दोष? “त्वमेव केवलं कर्तासि”!