Size म्हणजे काय रे भाऊ? आणि Effort म्हणजे रे काय?

समजा दिवाळीत घरी चकल्या बनवल्या जात आहेत. असे समजा कि आई चकल्या करणार आहे. घरी गेल्यावर तळलेल्या चकल्या बघून तुम्ही विचारता “किती चकल्या बनवल्या आज?” आई उत्तर देते “२ तास चकल्या बनवत होते”.

आता समजा कि बायको चकल्या करणार आहे. घरी गेल्यावर तळलेल्या चकल्या बघून तुम्ही विचारता “किती चकल्या बनवल्या आज?” बायको उत्तर देते “४ तास चकल्या बनवत होते”!

आता बायकोने आईपेक्षा जास्ती चकल्या बनवल्या की काय? Not sure…कदाचित कमीच बनवल्या असतील 🙂 पण मग चकल्या नक्की जास्ती कुणी बनवल्या? कसे कळायचे हे? आता तुम्ही शक्कल लढवता आणि तुमचा प्रश्न बदलता. “किती किलोच्या चकल्या केल्या आज?” And now you get expected answer – दोघींनीही साधारण १ किलो भाजणीच्या चकल्या बनवल्या, पण एकीला त्याच कामासाठी २ तास लागले, तर दुसरीला ४!

“१ किलो भाजणीच्या चकल्या” – हे सांगेल काम किती मोठे होते? That is – “size” of work.
“२ तासाच्या किंवा ४ तासाच्या चकल्या” ह्यावरून “काम किती मोठे होते?” हे कदाचित कळू शकणार नाही! Because that is effort! आणि effort हा व्यक्तीसापेक्ष असतोच! तेवढ्याच कामाला मला तुमच्यापेक्षा कमी किंवा जास्ती कष्ट (effort) पडू शकतात! आणि ह्यालाच आपण “productivity” असे म्हणतो 🙂 तेवढ्याच size चे काम जास्ती productive माणूस कमी कष्टात (effort) करू शकतो!

Please note – चकल्या बनवण्यात आई बायकोपेक्षा जास्ती productive असते असे मला सुचवायचे नाहीये. हे फक्त उदाहरण आहे! लोभ असावा हि विनंती 🙂

लग्नाचे लाडू बनवणे हे जर एक प्रोजेक्ट मानले तर “लग्नात लाडू किती लागतील?” ह्याचे उत्तर आपण नेहेमी “१० किलो” असेच देतो! १०० तासाचे लाडू लागतील असे उत्तर कधी ऐकलेले नाही – निदान मी तरी 🙂 “१० किलो” हा size आहे effort नाही!

पण मग एखाद्या software चे estimate मागितले तर आपण ते मात्र २०० “person days” असे का बरे देतो? २०० “person days” हा effort आहे. software किती मोठे आहे ह्याचे “२०० person days” हे उत्तर आहे का? माझ्या मते नाही! “२०० person days” हे “software बनवायचे कष्ट किती?”, ह्याचे उत्तर आहे. आणि “लागणारे कष्ट (effort)” हे व्यक्तीसापेक्ष असतात. तुम्हाला आणि मला लागणारा effort same नसू शकतो, software चा size तेवढाच असला तरी!

त्याचप्रमाणे लग्नाचे लाडू बनवणाऱ्याला जर २ दिवसांनी विचारले, “किती काम झाले आहे”? तर त्याच्याकडून काय उत्तर अपेक्षित असेल?

“४ किलोचे लाडू झालेत, ६ किलो लाडवाचे काम अजून बाकी आहे”, हे, कि, “१० person days चे काम झाले आहे”? ह्यापैकी कुठल्या प्रश्नाचे उत्तर योग्य असेल? 🙂

पण software project साठी हाच प्रश्न विचारला तर मात्र उत्तर मिळते “५०० person days चे काम झाले आहे”! अहो पण software किती बनलय? (२० तास काम केले ठीक आहे, पण लाडू किती वळलेत?) 

जर आपण software चा size मोजू शकलो तर जास्ती बरे होईल का? उदाहरणार्थ – “५० points चे software तयार आहे, २०० points चे software अजून बनायचे बाकी आहे”. Will this status be more meaningful?

पण मग आता पुढचा प्रश्न हा येतो कि software चा size मोजायचा कसा रे भाऊ?…..

ह्याचे उत्तर पुढच्या blog मध्ये….. 

 

– चिंगुडे

14 thoughts on “Size म्हणजे काय रे भाऊ? आणि Effort म्हणजे रे काय?

  1. Thanks Sachin for explaining this complex topic in such a easy to understanding way .This blog is eye opener. You need to write English version of this blog post as well so that the whole world can understand it. Keep doing the great job and I am really looking forward to your next post.

  2. Vishal Deshmuk says:

    Layee bhari aahye rye bhau…Mastach…
    Very simple way of explanation and ani tuza lobh paan kalaka ani baikola sangitala… 🙂 Productivity wadhali taar baghu 😉

  3. Deepak Peherkar says:

    Good content, easy to understand the view. I would suggest one thing, in your blog you mentioned effort in man days, now a days both men and women works in software field so I would suggest to use person days instead of man days for efforts.

    1. Sachin Dhaygude says:

      Thanks Deepak for your feedback. I have changed “man days” to “person days” 🙂

  4. Shriniwas Deshpande says:

    Perfect analogy Sachin. It can not be more simpler than this. Now I will never forget difference between size and effort.

  5. mukul latkar says:

    very nice article.. Size does matter 🙂 !..

  6. Sandy says:

    Khup chaan akhlan !! Saral sopi bhasa for the complex world of software.

  7. Uma says:

    Nice start!

  8. Seema says:

    Good One. Excellent. Need to read next blog…

  9. Saurabh says:

    Good analogy and explanation …

  10. Harsh Mohta says:

    Liked it Sachin! Learning can be fun; is what you showed here. 🙂

  11. Pratiksha says:

    Mastach re! Sachin…

  12. Anand Kulkarni says:

    Excellent explanation Sachin, now my non-technical mother & wife both will start talking in Agile language definitely 😉

    Cheers,
    Anand

  13. Sandeep Gaikwad says:

    Great Sachin,
    Wonderful write-up on two terminologies which are interchangeably used in Software development world.
    This blog clears out the concept very well.
    Waiting for next… 🙂

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *