परवा आमच्या घरी चकल्या बनवण्याचा कार्यक्रम झाला. आपण ह्याकडे एक प्रोजेक्ट म्हणून बघुयात…Every project is unique….कितीही वेळा चकल्या बनवल्या तरी every attempt is unique 🙂
ह्या प्रोजेक्ट मध्ये अनेक घटक चुकू शकतात. जसे की –
- भाजाणी कशी आहे – कितपत भरड आहे
- “मोहन” (हे विशेषनाम नाहीये 🙂 ) कितपत गरम असताना मिसळले
- पीठ मळताना पाण्याचे प्रमाण
- तळताना तेलाचे प्रमाण
- तेलाची quality
- कितपत मंद आचेवर चकली तळली जाते, इत्यादी, इत्यादी ….
ह्यापैकी काहीही गंडले तर चकली बिघडते!
माझ्या माहितीप्रमाणे हे प्रोजेक्ट बऱ्याचवेळा waterfall पद्धतीने केले जाते! जसे कि – पूर्ण १ किलो भाजाणी भिजवायची, मळायची, चकल्या घालायच्या, आणि तळायच्या. १ किलोच्या चकल्या करायला ३-४ तासाचे estimate असते. पण चकल्या तळून बाहेर आल्या कि मग लक्षात येते कि product जसे पाहिजे तसे झाले नाहीये! मग सगळे पीठ पुन्हा मळायचे, पुन्हा “मोहन”, पाणी, पुन्हा पीठ कमी अधिक सैल होणार, मग तळायचे ….इतके करून पुन्हा खात्री काही नाही कि आता चकली मस्त बनेल! आणि मग ३-४ तासाचे estimate पूर्ण चुकते! शेवटी शेवटी “आता संपवा एकदाचे हे” असे झालेले असते (very similar to end stage of any project) 🙂
आता, जर थोडी ह्या प्रोजेक्ट ची पद्धत थोडी बदलली तर?….
एका वेळी १०० gram भाजाणीच घ्या, तेवढीच भिजवा, तेवढेच मोहन, आणि तेवढा छोटा lot करून बघा. जर वाटले काही बदल हवा आहे, तर पुढच्या १०० gram मध्ये करून बघा, पुढचा lot मागच्या पेक्षाही चांगला करण्यासाठी काय करता येईल त्याचा विचार करून पुढे जा. कदाचित पहिले १-२ lot चुकतील पण पुढचे प्रत्येकी १०० gram चे ८ lot उत्तरोत्तर चांगले बनत जातील! छोट्या छोट्या increment मध्ये पटापट आणि बऱ्याचवेळा feedback मिळतील, ८-९ संधी मिळतील, शिकून सुधारायला! शिवाय अर्धा किलोच्या चकल्या झाल्यावर समजा असे वाटले कि आता बास! तर मग थांबताही येईल! कारण आता पीठ भिजवून ठेवलेय म्हटल्यावर करा १ किलोच्या चकल्या, असे होणारच नाही!
शिवाय ३-४ lot नंतर चकली जमून आली, तर मग हळूहळू, तिच्या अंगावर वेगवेगळ्या प्रकारचे काटे आणणे, तिला कमी-जास्ती तिखट बनवणे, कमी-जास्ती कडक करणे, तीळाने तिला सजवणे इत्यादी features चा विचार करत product जास्तीत जास्त valuable बनवातही येईल 🙂 .
बास! झाले तर मग! हि पद्धत जरा बरी वाटतेय ना? कुठलेही प्रोजेक्ट जर असेच करता आले तर?
ह्यालाच तर आजकाल “Agile” असे म्हणतात की रे भाऊ! 🙂
Disclaimer! – Agile means many different things. And this is not complete definition of what is agile. However, this is just an attempt to explain “what is agile” to someone, in “layman terms”. हि फक्त आणि फक्त तोंड ओळख आहे 🙂 गैरसमज नसावा….
चिंगुडे
Good Analogy. Good one.
EK Number aahe Sachi Bhau
Good and Unique attempt
relay good one can explain this to the small scale business community about the terms which they can implement for better business
ThanksAmol
Very Good example but applicable to only few audience. There are very little crowd who is aware of the recipe 🙂
Nicely framed! Like it. 🙂
Sachin can explain very complex concept with simplicity and ease.
Sachin,
After a long time I visited my mail box and saw your mail so read it .. ( sorry but I don’ t visit this mail box often ! )
Agile is a very popular word/ concept used in corporate world now a days.
You have very nicely explained the concept of “Agile” with commonly seen- household example !!,
I can not resist my self in using this example while giving lecture ‘team building’ & behavior analysis.. which I conduct ..
keep me posted on such mails / thoughts ..
Thanks ,
Dilip Vaze
Thank you so much for your feedback! I will definitely keep you informed about any new blogs…