परवा मी एका लग्नाला गेलो होतो. लग्न म्हणजे पण एक मोठे प्रोजेक्ट्च नाही का? तर ह्या प्रोजेक्ट चे एक “work package” होते “आवरून वेळेवर तयार होणे”. आणि ह्या “work package” च्या अनुषंगाने येणाऱ्या activities आणि त्यांचा sequence हा साधारण खाली दाखवल्या प्रमाणे होता. लग्न झालेल्या आणि पोरे-बाळे असणार्या सगळ्यांच्या activities आणि त्यांचा sequence साधारण असाच असेल ह्याची मला खात्री आहे 🙂
तर ह्या चित्रात दाखवल्या प्रमाणे, “तुमची अंघोळ”, “तुम्ही कपडे करून तयार होणे”, “मुलांना तयार करणे”, इत्यादी activities ह्या तुमच्या बायकोच्या तयार होण्याबरोबर parallel चालू शकतात (किंवा त्या तशाच होतात 🙂 ). आता इथे २ कामे समांतर चालू आहेत आणि लग्न झालेला कोणीही सांगेल कि ह्यातल्या कुठल्या कामांना जास्ती वेळ लागू शकतो 🙂
“तुमची अंघोळ”, “तुम्ही कपडे करून तयार होणे”, “मुलांना तयार करणे”, ह्यापैकी कुठल्याही कामात १०-१५ मिनिटाचा उशीर जरी झाला तरी “वेळेवर आवरून तयार होणे” ह्या milestone ला धक्का लागणार नाही! कारण “बायकोचे साडी नेसणे”, “साडी पिन-उप करणे”, “मेकअप करणे”, इत्यादी कामांना लागणाऱ्या वेळेच्या तुलनेत, इतर कामांमध्ये १०-१५ मिनिटाचा उशीर काहीच नाही!
तर, लाल चौकोनात दाखवलेल्या activities “वेळेवर आवरून तयार होणे” ह्या milestone ची वेळ ठरवतात. ह्यापैकी कुठल्याही activity मध्ये १ मिनिटाचा जरी उशीर झाला तरी milestone delay होऊ शकतो! म्हणजेच ह्या activities “critical” आहेत! आणि त्या activities चा क्रम हा “critical path” आहे! परंतु “तुमची अंघोळ”, “तुम्ही कपडे करून तयार होणे”, “मुलांना तयार करणे”, ह्या activities “non critical” आहेत! ह्यापैकी कुठल्याही कामात १०-१५ मिनिटाचा उशीर जरी झाला तरी काही फरक पडत नाही, म्हणजेच ह्या activities वर “float” आहे 🙂
आता अजून एक गम्मत अशी कि नेमक्या ह्या “critical activities” वरच खूप साऱ्या risks असतात. जसे कि – साडी चपखल नीट नेसली न जाणे, साडी चे पिन-अप नीट नसणे, matching गोष्टी वेळेवर न सापडणे, मेकअप मनासारखा न होणे, इत्यादी…आणि बऱ्याचवेळा ह्या risks प्रत्यक्षात घडतात सुद्धा! आणि मग स्वाभाविक पणे schedule बोंबलते! आणि तुमची सगळी कामे मात्र “non critical” असल्याने वाट बघत राहण्यापलीकडे तुम्ही फारसे काही करूच शकत नाही!
आता हे schedule कंट्रोल करायचे असेल तर दोनच पर्याय संभवतात – १) काही गोष्टी parallel करणे (जसे कि साडी नेसता नेसता matching गोष्टी शोधून ठेवणे) किंवा २) एखाद्या कामावर जास्ती resources कामाला लावणे (जसे कि साडी नेसायला सासूबाई किंवा जाऊ ची मदत घेणे). ज्यालाच “fast tracking” किंवा crashing म्हणतात 🙂
अर्थातच ह्या पैकी कुठलाही पर्याय निवडला तर risks अजून वाढू शकतात 🙂
लग्न झालेल्या प्रत्येकाला ह्याचा व्यवस्थित अनुभव असणारच. तेंव्हा “critical path म्हणजे काय रे भाऊ?”, ह्याचे उत्तर मिळाले असेल अशी अपेक्षा करतो! 🙂
— चिंगुडे